पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी (24 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दोन्ही बाजूचे प्रबळ नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट येथील शिवसेना भवन कार्यालयास भेट दिली. यावेळी भाजपा आणि शिवसेना महायुती कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा १०० टक्के जिंकणारच असा विश्वास शिंदेनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- पुणे: वाढत्या तापमानाचा कृषी खात्याला धसका; परिणामांच्या अभ्यासासाठी समिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या आग्रहास्तव पुणे शहर कार्यालयास भेट देण्यास आलो असून सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते हे चांगल काम करीत आहेत. कसबा मतदारसंघ शिवसेना- भाजप युतीचा बालकिल्ला आहे. या ठिकाणी आमचे उमेदवार हेमंत रासने १०० टक्के प्रचंड बहुमताने जिंकणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम झाला. त्याठिकाणी भगव वादळ पाहण्यास मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना भाजप महायुती कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा १०० टक्के प्रचंड मतांनी जिंकणार असल्याचा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
हेही वाचा- पिंपरी: पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवार यांचे वक्तव्य
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी या वर्षीपासून होणार की २०२५ पासून याबाबत परीक्षार्थींमध्ये संभ्रम कायम आहे. या मुद्द्यावरून आता राज्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी वर्गाच्या बाजूने सरकार असून त्याबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबतच पत्र आयोगाला देण्यात आलं असून लवकरच आयोग देखील विद्यार्थी वर्गाच्या बाजूने निर्णय घेईल, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.