मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी घेतला.याच निर्णयाचा धागा पकडत पुण्यातील शिवसृष्टी लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण मिळाल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा >>> किल्ले शिवनेरीवरील नियोजनावरून संभाजीराजेंची नाराजी; CM शिंदे म्हणाले, “शिवरायांच्या दर्शनासाठी…”
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव येथे साकारण्यात आलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शिवजयंती निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> ‘शिवसृष्टी’ पाहणारा प्रत्येकजण राष्ट्रप्रेमाचं ‘शिवतेज’ घेऊन जाईल; बाबासाहेब पुरंदरेंनी ५० वर्षे… – देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी असंख्य गडकिल्ले बांधले.त्यावेळी आजच्या सारखी यंत्रणा नसताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले उभारले आहेत. हे कार्य पाहून त्यांच्यामध्ये दैवी शक्ती असल्याच दिसून येत.तसेच आज पुण्यात शिवसृष्टीच लोकार्पण होत असून त्यांचा खूप आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर कारभार करीत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला हा धनुष्यबाण मिळाल असून अखेरच्या व्यक्तीला न्याय देण्याच काम सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.