वाहतूक सेवा पुरविल्याबद्दल सुमारे २०० कोटी रुपये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पीएमपीला तातडीने द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. पीएमआरडीए क्षेत्रातील पीएमपीच्या वाहतुकीबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आदेश दिले.

हेही वाचा >>> पुणे : खेड तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात बारावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

पीएमपीकडून पीएमआरडीए क्षेत्रात ४७७ बसद्वारे दररोज वाहतुकीची सेवा दिली जाते. त्यासाठी दरमहा १८८ कोटी रुपयांचा खर्च पीएमपीला येतो. सन २०२१-२२ या वर्षांचे पैसे मिळावेत, यासाठी पीएमपीकडून पीएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे पीएमपीकडून पीएमआरडीए क्षेत्रात बस वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवासह दोघांना तीन लाखांची लाच घेताना पकडले

दरम्यान, दोन्ही महापालिकांनी पीएमपीचा पुढील वर्षांत होणारा संभाव्य तोटा लक्षात घेऊन आपापल्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर पूर्ण आढावा घेऊन चर्चा करण्याचे ठरले. पीएमआरडीए क्षेत्रात तीन ठिकाणी पीएमपीचे आगार सुरू होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात बससेवेचा विस्तारही होणार आहे.