आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतले. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत शेतकरी सुखी आणि आनंदी व्हावा असे साकडे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माऊलींकडे घातले. अभिष्टचिंतन आणि वारकरी संतपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आळंदीमध्ये आले होते.
हेही वाचा : आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आळंदीमध्ये आले होते. यावेळी शिंदे यांनी मुख्य मंदिरात जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. बळीराजाला सुखी आणि समाधानाचे दिवस येवोत असे साकडे यावेळी माऊलींच्या चरणी शिंदे यांनी घातले. कालच गणरायाचे आगमन झाले आहे. हे आगमन राज्यात भरभराटी आणि सुख- समृद्धी घेऊन येईल अशी प्रार्थना गणराया चरणी केल्याचे देखील मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.