पुणे : पुणे आणि पिंपरी- चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपया १० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सीएनजी दर आता प्रतिकिलो ८९ रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिचवडसह चाकण, तळेगाव हिंजवडमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. कंपनीने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपये १० पैसे वाढ केली. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८९ रुपयांवर गेला आहे. गेल्याच महिन्यात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपये वाढ झाली होती. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८७.९० रुपयांवर गेला होता.आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने त्याची आयात महागली आहे. यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचे पाऊल उचलले आहे.
आणखी वाचा- अपघातानंतर मित्र पसार, गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू; बिबवेवाडी भागातील घटना
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतही वाढत आहे. यामुळे सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर वाढ झाली आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो ८९ रुपये झाला असला तरी त्यातून पुण्यातील मोटारचालकांची पेट्रोलच्या तुलनेत ४० टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २० टक्के बचत होत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
यावर्षी जुलै महिन्यापासून सातत्याने सीएनजीचे दर वाढले आहेत. सध्या इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनचालकांच्या खिशाला झळ बसत आहे.
आणखी वाचा-सेट परीक्षेची तारीख जाहीर… परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन?
ऑपरेशनल क्षमता आणि ग्राहकांच्या परवडण्याची शक्यता यांचा समतोल राखण्यासाठी एमएनजीएलने या वाढीचा काही भाग स्वतः काढून घेतला आहे. परिणामी, पुण्यातील सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपया १० पैसे वाढ झाली आहे. त्यात उत्पादन शुल्क आणि राज्य मूल्यवर्धित कर समाविष्ट असून तो एकूण वाढीचा सुमारे १५ टक्के आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.