पुणे : भाजप नेत्यांकडून सतत महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान होत असताना त्याच दरम्यान भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत असे विधान केले होते. या विधानावर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चौकात पुणे शहर महिला काँग्रेसच्या पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.अक्कल कमी जीभ लांब अशा घोषणा देत अमृता फडणवीस यांच्या विधानाचा महिला काँग्रेसने निषेध नोंदविला आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, मोहन जोशी, कमल व्यवहारे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा पूजा आनंद म्हणल्या की, केंद्र आणि राज्य सरकार सर्व सामन्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरत आहे. त्या प्रश्नापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नेत्यांकडून सतत महापुरुषांबद्दल विधाने केली जात आहे त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल जे विधान केले आहे. ते निषेधार्ह असून देशातील जनतेची त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा: मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांच्या विधानावरून काँग्रेसची भाजपावर टीका

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, महात्मा गांधी हे राष्ट्रपिता काल, आज आणि उद्या देखील राहतील .पण अमृता फडणवीस यांना राष्ट्रपिता आणि राष्ट्रविक्रेता यांच्यातील फरक कळला नाही.त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येत असल्याचे सांगत अमृता फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.