ससून सर्वोपचार रूग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास उपचार करण्यासाठी ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. देशात ही यंत्रणा प्रामुख्याने खासगी रुग्णालयात आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वप्रथम ससून रूग्णालयात ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा सुरू झाली असून, या यंत्रणेमुळे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत रुग्णाला उपचार मिळणार आहेत.

हेही वाचा >>> प्रतीक्षा संपली! गरवारे ते रूबी हॉल, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय मेट्रो सेवा लवकरच सुरू

13 year old girl stands again despite being paralyzed from waist down due to rare disease
दुर्मीळ आजारामुळे कंबरेपासून खालचा भाग निकामी होऊनही १३ वर्षीय मुलगी पुन्हा उभी राहिली!
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
medical examinations, J J Hospital Mumbai, Report of Committee,
रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासण्या उपलब्ध नसल्यास कारवाई अयोग्य, जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांवरील आरोपाबाबात समितीचा अहवाल
vaccination campaign launched reduce obesity among obese unemployed youth In Britain
लठ्ठ बेरोजगारांचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ‘बोजा’! सडपातळ आणि रोजगारक्षम बनवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवणार?
Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
Organ transplants, Sassoon Hospital, private hospitals,
अवयव प्रत्यारोपण आता अगदी कमी खर्चात! खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांना ससूनचा स्वस्त पर्याय
State of the Art Hand Surgery at JJ Hospital Mumbai news
जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक पध्दतीने हाताची शस्त्रक्रिया
Orbito tripsy treatment of 86 year old man with heart problem was successful Pune news
हृदयविकारावर ८६ वर्षीय वृद्धाची मात! ऑरबिटो-ट्रिप्सी उपचार प्रक्रियेविषयी जाणून घ्या…

ससून रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज सुमारे तीन हजार रुग्ण येतात. त्यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक असतात. याचबरोबर रूग्णालयात दाखल रूग्ण आणि त्यांचेही नातेवाईक असतात. एखाद्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास अथवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास तातडीने उपचार करण्याची परिस्थिती उद्धभवते. याचबरोबर रुग्णाबरोबर आलेल्या व्यक्तीवरही उपचाराची आवश्यकता भासते. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यास पहिले दहा मिनिटे हा सुवर्ण काळ मानला जातो. त्या कालावधीत उपचार झाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. हाच विचार करून ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा सुरू झाली आहे. त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात असून, ते २४ तास उपलब्ध असेल. या पथकात डॉक्टर, भूलरोग तज्ज्ञ, औषधशास्त्र तज्ज्ञ, परिचारिका आणि परिचरांचा समावेश असेल.

हेही वाचा >>> राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पावसाची नोंद

या यंत्रणेचे उद्घाटन ससूनचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी ठाकूर यांनी ‘कोड ब्ल्यू’चे समन्वयक डॉ.किरणकुमार जाधव, डॉ.सुजित क्षीरसागर, डॉ.धनंजय उगले, डॉ.राहुल पंडित आणि गौरव महापुरे यांच्याकडे या यंत्रणेची जबाबदारी सुपूर्द केली. या प्रसंगी डॉ. रोहिदास बोरसे, डॉ.आनंद पांडे, डॉ.आरती किणीकर, डॉ.नरेश झंझाड, डॉ.यलाप्पा जाधव, डॉ.सुनील भामरे आदी उपस्थित होते.

‘कोड ब्ल्यू’ कशा प्रकारे काम करणार?

रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्याची उद्घोषणा ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे केली जाईल. याचबरोबर रुग्णालयातील कोणत्याही विभागातून सात क्रमांक डायल करून ‘कोड ब्ल्यू’ पथकाला पाचारण करता येईल. हे पथक १२० सेंकदांच्या आत संबंधित रुग्णाकडे धाव घेऊन त्याच्यावर तातडीचे उपचार करेल.