पिंपरी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचे काम करणा-या बचत गटातील महिलांशी आयुक्त शेखर सिंह हे आता महिन्यातून दोनवेळा संपर्क साधणार आहेत. त्यासाठी ‘कॉफी विथ कमिशनर’ हा उपक्रम पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केला असून, त्याद्वारे संबंधित महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी दिशा उपक्रमाअंतर्गत शहरातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचे काम देण्यात आले आहे. त्यातील विविध महिला बचत गटातील महिलांना काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या माध्यमातून या महिलांना येणाऱ्या समस्या सोडवण्याबरोबरच आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक शौचालयांच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘कॉफी विथ कमिशनर’ उपक्रमाची पहिली बैठक गुरुवारी झाली. त्यामध्ये ‘अ’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक शौचालय देखभालीचे काम करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी महिलांशी संवाद साधताना नवी दिशा उपक्रमामध्ये भविष्यातील संधी, आव्हाने याबाबत माहिती दिली. महिलांनीही त्यांच्या समस्या आणि अनुभव सांगितले.

हेही वाचा >>>कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, महापालिकेच्या वतीने महिन्यातून दोनवेळा ‘कॉफी विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. विविध क्षेत्रीय कार्यालयांतील संबंधित महिलांना आयुक्तांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.नवी दिशा उपक्रमाने आम्हाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. समस्या, अभिप्राय आणि सूचना आयुक्तांसमोर मांडण्याची संधी मिळाली. महापालिका आमच्या सूचनांवर विचार करेल. या उपक्रमांमुळे नवी दिशा उपक्रमातील महिला बचत गटांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यास नक्कीच मदत मिळेल, असा विश्वास भरारी महिला बहुउद्देशीय मंडळाच्या लता रोकडे यांनी व्यक्त केला.