पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन थंडी अवतरली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानातील ही घट कायम राहणार आहे. शहरात सध्या गेल्या तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे.

हेही वाचा- पुणे: दिवाळीत शहरात लुटमारीच्या घटनांचे प्रमाण वाढले

पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातून २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी गेला. यंदा शहराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. १ ऑक्टोबरपासून शहरात सुमारे ३५० मिलिमीटर आणि सरासरीपेक्षा तब्बल २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली. शहरात पावसाळी वातावरण असताना २२ ऑक्टोबरपर्यंत किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या वर नोंदविले जात होते. मात्र, पाऊस परतल्यानंतर आकाशाची स्थिती निरभ्र झाली आणि शहराच्या तापमानात एकदमच ६ अंशांनी घट होऊन ते १५.८ अंशावर गेले. त्यामुळे दिवाळीत शहरांमध्ये थंडी अवतरली. त्यानंतर तापमानातील ही घट कायम राहिली.

हेही वाचा- प्रशासनाचा ‘प्रभावी कारभार’; करोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यावर जास्त पैसे वर्ग; आता वसुलीचे आव्हान

२४ ऑक्टोबरला १४.४ अंश सेल्सिअस, तर २५ ऑक्टोबरला यंदाच्या हंगामातील निचांकी १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. बुधवारी (२६ ऑक्टोबर) शहरात १४.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. गेल्या तीन दिवसांतील हे तापमान गेल्या तीन वर्षांमधील नीचांकी तापमान ठरले. पुढील चार ते पाच दिवस याच पातळीवर तापमानाचा पारा राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Story img Loader