उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी खाली आले आहे. पुण्यातही तापमान दहा अंशांवर आले आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १०.८ तर पुण्यात १०.९ अंश नोंदले गेले.
राज्यात उत्तरेकडून येणारे थंड व कोरडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे कमाल किमान तापमानात सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व शहरांचे तापमान सरासरीपेक्षा चार ते सहा अंशांनी खाली आले आहे. त्यामुळे शेकोटय़ा पेटल्याचे चित्र दिसून लागले आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. सकाळ आणि संध्याकाळी थंडीने हुडहुडी भरू लागली आहे. येत्या चोवीस तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे तापमान बारा अंशांच्या आसपास आहे. त्यात शनिवारी तापमान दहा अंशांवर खाली आले आहे. त्याच बरोबर दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा जागा आता बोचऱ्या थंडीने घेतली आहे. येत्या चोवीस तासांत आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला – पुणे १०.९ अंश
उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी खाली आले आहे.
First published on: 17-11-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold increase in pune