पुणे : राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान विषयक स्थिती कार्यरत नाही. राज्यभरात कोरडे हवामान आहे. त्यामुळे गुरुवार, २३ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम राहील. सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल.

हेही वाचा : देहूत मनोज जरांगे यांची रॉयल एन्ट्री; तुकोबांचं घेतलं दर्शन, म्हणाले, “या सरकारला….”

Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Economy Growth rate likely to fall to 6 4 percent
अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार! विकासदर ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख

गुरुवारी, २३ नोव्हेंबरपासून राज्यात आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसोबत बाष्पयुक्त वारे राज्यात येतील. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यात सर्वांत कमी १४.० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद जळगावात झाली आहे, तर सर्वाधिक ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद रत्नागिरीत झाली आहे.

Story img Loader