चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी सापडली शिवकालीन तोफ, लवकरच किल्ल्यावर विराजमान होणार

उड्डाणपूल प्रकल्पाचे काम ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी आणि इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगती पथावर आहे. सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच मार्गिका आणि सातारा-मुंबई साठी तीन मार्गिका अशा एकूण आठ मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त २ मार्गिका उपलब्ध आहेत.

हेही वाचा >>>पुणे : संगणक अभियंत्याची साडेअकरा लाखांची फसवणूक ; गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

बेंगळुरू मुंबई महामार्गावरील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) आणि माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शृंगेरी मठाच्या बाजूने सातारा वारजेकडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. बावधन कडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ६ चे काम प्रगतीत असून दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. कोथरुड- वारजे- सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

मुळशी मुंबई रॅम्पच्या उर्वरित भूसंपादनाच्या कामाच्या अनुषंगाने न्यायप्रविष्ठ प्रकरणात वीस ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे महापालिकेकडून जागेचा ताबा मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. उर्वरित काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती यावेळी संजय कदम यांनी दिली.

हेही वाचा >>>मनसेची भिस्त ‘राज’दूतांवर ! ; हजार मतदारांमागे मनसेचा एक राजदूत, निवडणुकीसाठी मनसेची नवी रणनीती

एनडीए सर्कलचे सुशोभीकरण

कोथरुड- एनडीए रस्ता- मुळशी आणि एनडीए – मुंबईच्या दरम्यान असणाऱ्या ‘एनडीए सर्कल’ चे सुशोभीकरण करण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी एनडीए, पुणे महानगर पालिका आणि एनएचएआय यांची संयुक्त बैठक घेऊन चौकाचे सुशोभीकरण करण्याविषयी सूचना केली. त्यानुसार दिशा कन्सल्टंट यांच्याकडून बनवण्यात आलेल्या आराखड्यास (मॉडेल) एनडीएकडून नुकतीच सहमती मिळालेली आहे. हे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector dr rajesh deshmukh order to complete the flyover works at chandni chowk quickly pune print news amy