पुणे : प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उत्कर्षा संतोष लोंढे (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. उत्कर्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदित्य चंद्रकांत ढावरे (वय २५, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उत्कर्षाचे वडील संतोष (वय ४५) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> भोसरीत बैलगाडा शर्यतीच्या शिल्पाची उभारणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्षाचे आरोपी आदित्यशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आदित्यच्या कुटुंबीयांना प्रेमप्रकरणाची माहिती होती. उत्कर्षा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह करु, असे तिने त्याला सांगितले होते. आदित्यने तिला नोकरी मिळाल्यानंतर विवाह करु, असे सांगितले होते. आदित्यचा आईचा मृत्यू झाला. तेव्हा वर्षभरात विवाह न केल्यास तीन वर्ष विवाह करता येणार नाही, असे आदित्यने तिला सांगितले. त्याने विवाहासाठी तगादा लावला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवाह करु, असे तिने त्याला सांगितले. आदित्यच्या त्रासामुळे उत्कर्षाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत तपास करत आहेत.