ऐश्वर्या पांडुरंग बारवे ही महाविद्यालयीन मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. ऐश्वर्या तिच्या मामासोबत कॉलेजला दुचाकीवरून जात होती. आंबेगावच्या चास येथील संत ज्ञानेश्वर मंदिरापाशी आले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने ऐश्वर्यावर हल्ला चढवला. प्रसंगावधान दाखवत बिबट्याचा हल्ला ऐश्वर्याने परतवला. मात्र या हल्ल्यात तिच्या पायाला काही प्रमाणात जखम झाली. या घटनेमुळी परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे माणसावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे परिसरात पिंजरा लावावा आणि या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ऐश्वर्या घाबरून गेली. मात्र या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली आहे. मुलगी ऐश्वर्या बारवे ही तिच्या मामासोबत महाविद्यालयात जात असताना हा हल्ला झाला.

 

 

Story img Loader