पुणे : हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना घडली. हनुमान टेकडी परिसरात घडलेली लूटमारीची ही तिसरी घटना आहे. याबाबत एका महाविद्यालयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती एका महाविद्यालयात आहे.

हेही वाचा >>> सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (४ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास युवती आणि तिचा मित्र सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी युवती आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला धमकावून शिवीगाळ केली. त्यांना काेयत्याचा धाक दाखविला. युवतीला मारहाण करुन चोरट्यांनी युवतीच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. घाबरलेली युवती आणि तिचा मित्र तेथून घरी गेले. युवती घाबरली होती. त्यानंतर तिने सोमवारी (६ जानेवारी) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा >>> ‘रेडझोन’ला ‘लाल दिवा?’ सीमेबाबत संभ्रमावस्था कायम; अंतिम नकाशाची प्रतीक्षा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत. हनुमान टेकडी परिसरात गेल्या दोन महिन्यात टेकडीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवकांना लुटल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. बाणेर-पाषाण रस्त्यावरील टेकडीवर फिरायला आलेल्या महाविद्यलायीन युवकांना लुटण्यात आल्याची घटना घडली होती. चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली होती. पुणे शहरात टेकड्या आहेत. टेकड्यांवर नागरिक नियमित फिरायला जातात. हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, पाषाण-बाणेर रस्त्यावरील टेकडी, तळजाई टेकडी परिसरात फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. टेकड्यांवरील लुटमारीच्या घटना घडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. बोपदेव घाटात मित्राबरोबर आलेल्या फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवतीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

Story img Loader