पुणे : मोटारीवर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माॅडेल काॅलनी भागातील दीपबंगला चौकात घडली. अर्पण महेश महाजन (वय २०, रा. अनंत अपार्टमेंट, माॅडेल काॅलनी, दीपबंगला चौक ) असे मृत्यमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा – लोणावळ्यात दोन नेपाळी तरुणांचा तलावात बुडून मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले तरुण

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील ‘ते’ भीषण स्फोट अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करताना; कॅप्सूल टँकरमधून घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरताना झाले स्फोट

याबाबत पोलीस नाईक बाबा दांगडे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अर्पण हा रविवारी (८ ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास दीपबंगला चौकातून भरधाव वेगाने निघाला होता. दुचाकीस्वार अर्पणचे नियंत्रण सुटले. तेथून निघालेल्या मोटारीवर दुचाकीस्वार अर्पण आदळला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अर्पणचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करत आहेत.

Story img Loader