लोणावळ्यात बस स्टॅन्डमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. हे प्रकरण थेट लोणावळा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बोलवून समज दिली आहे. अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कोंढव्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, परदेशातील तरुणीसह तिघी ताब्यात; मसाज सेंटर चालकावर गुन्हा

हेही वाचा – पिंपरी : अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळातील तरुणांचे साहस, ८०० फुटांवरुन झळकावला तीस फुटी फलक

लोणावळ्यातील बस स्टॅन्डमध्ये हिंदी चित्रपटात साजेशी फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास महाविद्यालयीन दोन गट आमने- सामने आले तेव्हा त्यांच्यात फ्रीस्टाइल हाणामारी झाली. १५ ते २० जणांच्या गटाने एकमेकांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारण्यास सुरुवात केली. हाणामारी सोडवण्यासाठी बस स्टॅन्डमधील कर्मचारीमध्ये पडला. त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काही तरुण एकमेकांना मारहाण करतच होते. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी महाविद्यालयीन तरुणांना समज दिली आहे. हे तरुण इयत्ता अकरावी आणि बारावीतील असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College students clash bus stand lonavala video kjp 91 ssb