जुन्नर : जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन परिसरात भ्रमंतीसाठी आलेला पिंपरीतील तरुण तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.विकी राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. राठोड पिंपरीतील रहिवासी आहे. राठोड आणि त्याचे मित्र जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ला परिसरात आले होते. कल्याण दरवाजा परिसरात खडकाळ भागावर तो थांबला होता. त्यावेळी तो तोल जाऊन पडला.
दगडावर डोके आपटल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्य झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवनेरी रेस्क्यू पथकाचे सदस्य राजकुमार चव्हाण, मगदूम अली सय्यद, अनिकेत करवंदे, तसेच वनविभागाच्या पथकाने त्याचा मृतदेह किल्ल्यावरुन खाली आणला. राठोड तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.