पुणे : मध्यभागातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला. मंडईतील रामेश्वर चौकात डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी रस्त्याने विरुद्ध दिशेने आलेला एक दुचाकीस्वार अचानक समोर आल्याने दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुण रस्त्यात पडला. तेथून निघालेल्या डंपरच्या चाकाखाली सापडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. बेशिस्तीमुळे महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

शुभम दादासाहेब डोके (वय २१, रा. सुदर्शन हेरिटेज, मगरपट्टा सिटी साऊथ गेटजवळ, हडपसर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणारा चालक, तसेच डंपरचालक कमलदेव कैलास महातो ( रा. झारखंड) यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावर एकेरी वाहतूक आहे. वाहनचालकांना रामेश्वर चौकातून मंडईकडे आणि स्वारगेटकडे जाण्याची मुभा आहे.

रामेश्वर चौकातून डावीकडे श्रीनाथ चित्रपटगृहाकडे वळवण्यास बंदी आहे. दुचाकीस्वार शुभम डोके एका महाविद्यालयात ओैषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाला होता. मंगळवारी सकाळी तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन तो छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे निघाला होता. रामेश्वर चौकात अचानक एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने आला.

हेही वाचा : भूगावमधील मानस लेकमध्ये मोटार कोसळून एकाचा मृत्यू

दुचाकीस्वार शुभमने जोरात ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरली. त्यावेळी तेथून स्वारगेटकडे निघालेल्या डंपरच्या चाकाखाली सापडून शुभम गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभमला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर विरुद्ध दिशेने आलेला दुचाकीस्वार पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करत आहेत.

Story img Loader