लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: लोणी काळभोर भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याने ३६ वर्षीय प्राध्यापिकेची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत, तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पाच हजार डाॅलरची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाविद्यालयीन युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयंक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) असे गुन्हा दाखल केलेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याबाबत एका प्राध्यापक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार प्राध्यापक महिला लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत आहे. मयंक सिंगने प्राध्यापिकेला समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविली होती. त्यानंतर त्याने समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन प्राध्यापिकेला धमकावण्यास सुरुवात केली. मी सांगितले तसे नाही केले तर समाजमाध्यमात तुमची छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेला धमकावून त्यांची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत तयार केली.
हेही वाचा… आताच भाजप जातीवादी झाला का? रावसाहेब दानवे यांचा विरोधकांना सवाल
त्यानंतर राॅबिन नावाच्या खातेधारकाने महिलेस धमकावले. महिलेची ध्वनिचित्रफीत त्याने पतीस पाठविले, तसेच त्यांच्याकडे पाच हजार अमेरिकन डाॅलरची मागणी केली. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या प्राध्यापक महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गंधाले तपास करत आहेत.