पुणे : मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना बाणेर टेकडी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीजेंदाई कामेई (वय १९, सध्या रा. आनंदनगर, जुनी सांगवी, मूळ रा. नागालँड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत कामेई याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कामेई आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी बाणेर टेकडी फिरायला गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कामेई आणि त्याच्या मित्राला चाैघांनी अडवले. त्याला मारहाण करुन चोरट्यांनी शस्त्राने पायावर वार केला. त्याच्याकडील २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले तपास करत आहेत. यापूर्वी पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडी परिसरात लुटणारीच्या घटना घडल्या होत्या.

हे ही वाचा…काच कारखान्यातील दुर्घटनेप्रकरणी मालकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा, येवलेवाडीतील दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू

प्रवासी तरुणाला मारहाण करुन लूट

प्रवासी तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी त्याच्याकडील पिशवी चोरून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका रविवारी मध्यरात्री घडली. याबाबत आकाश बाबासाहेब आगळे (वय २०, रा. विठ्ठलनगर, खराडी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरला निघाला होता. दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी त्याच्याकडे तंबाखू मागितली. तेव्हा त्याने तंबाखूचे सेवन करत नसल्याचे चोरट्यांना सांगितले. चोरट्यांनी त्याच्या डोक्यात हातोडी मारली. त्याच्याकडील पिशवी चोरुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College youth who went for vacation with friend brutally beaten and robbed in baner hill area pune print news rbk 25 sud 02