नारायणगाव : ओतुर कडुन नारायणगावच्या जाणाऱ्या पिकअप गाडी व नारायणगाव कडुन ओतुरचं दिशने येणाऱ्या फियाट लिना कार यांची समोरासमोर धडक होवुन अपघात होऊन जुन्नर तालुक्यातील आळू येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील विद्यार्थी आणि पालक असे २० जण जखमी झाले आहेत . दरम्यान , विद्यार्थी व पालक हे शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रमाकरीता खोडद ता. जुन्नर येथे जात असताना अपघात झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले. ओतुर – नारायणगाव रस्त्यावरील धोलवड रोड येथे शुक्रवार ( दि. ७) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओतुर बाजुकडुन नारायणगाव बाजुने जाणाऱ्या पिकअप गाडी ( क्र. एम.एच १४ जि.यू १५६६) व नारायणगाव बाजुकडुन ओतुर बाजुने येणाऱ्या फियाट लिना कार ( क्र. एम.एच १२ जी.एफ ०८६० ) यांची समोरासमोर धडक झाली . पिकअप मध्ये जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील विद्यार्थी व पालक हे होते ते जखमी झाले आहेत . हे सार्वजण शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रमाकरीता खोडद येथे जात असताना हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पिकप मध्ये अरविंद बबनराव हांडे वय ५५ वर्ष रा. पिंपळगाव जोगा ता.जुन्नर जि पुणे (चालक), २) ईश्वरी मोहन बोकड वय ८ वर्ष, ३) यश पंडित घाडगे वय ७ वर्षे, ४) सार्थक प्रकाश साळवे वय ८ वर्षे, ५) ऋषी राजेंद्र भले वय ८ वर्ष, ६) कुणाल भगवान लोहकरे वय ७वर्षे, ७)सर्वेश पोपट बोकड वय ७ वर्षे, ८)श्रेया भाविक धोत्रे वय ८ वर्षे, ९)शिवांश सुधिर सस्ते वय ८ वर्षे, १०)आदित्य संपत तळपे वय ९ वर्ष, ११) मीना भगवान लोकरे वय २३ वर्षे, १२) प्रकाश कचरू साळवे वय ३९ वर्षे, १३) विठ्ठल रखमा गाडगे वय ७० वर्षे, १४ ) कल्पना भिमराव धोत्रे वय ५० वर्ष सर्व रा. अळू ता.जुन्नर १५) सुधीर जगन सस्ते वय ४२ वर्षे रा पिंपळगाव जोगा येथील आहेत किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच कारमधील १) हर्ष दिनेश शहा वय २४ वर्षे रा.आदिनाथ सोसायटी, पुणे ता. हवेली जि पुणे (चालक),२) ऋग्वेद युवराज पुसदकर वय २२ वर्षे रा.पुणे ३) हिमांशू किशोर पांडे रा. नऱ्हे पुणे, ४) सुरज संतोष मोरे वय २६ वर्षे रा. धनकवडी पुणे, ५) प्रतीक दुनगुले पूर्ण नाव माहित नाही रा.पुणे अशी त्याची नावे असल्याचे ओतूर पोलिसांनी सागितले.पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहोत.