उद्योगनगरी, कष्टकऱ्यांची नगरी, श्रीमंत शहर अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडसाठी गौरवगीत तयार करण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहराची जडणघडण, ऐतिहासिक संदर्भ, भौगोलिक माहिती, सांस्कृतिक वाटचाल यासह महापालिकेच्या विकासकामांमुळे झालेली प्रगती व कायापालट या सर्वाची नोंद या गौरवगीतात घेतली जाणार आहे.
वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत असलेल्या शहराचे गौरवगीत करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी शहरातील कवी तसेच गीतकारांना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आवाहन केले आहे. जे गीत निवडण्यात येईल, त्यास दहा हजार रूपयांचे मानधन दिले जाणार आहे. प्रेरणादायी स्वरूपाचे हे गौरवगीत पाच अंतऱ्याचे राहणार असून त्यात शहराच्या प्रगतीचा आढावा व महत्त्वाची माहिती समाविष्ट राहणार आहे. नामवंत कवींकडून या गीताचे परीक्षण होणार आहे. विद्युत विभागाच्या कार्यालयात ३० नोव्हेंबपर्यंत हे गीत स्वीकारले जाणार आहे, प्राप्त गीतांपैकी उत्कृष्ट गीताची निवड करण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2013 रोजी प्रकाशित
पिंपरी-चिंचवडसाठी गौरवगीत लिहा – आयुक्तांचे कवी-गीतकारांना आवाहन
पिंपरी-चिंचवड शहराचे गौरवगीत करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी शहरातील कवी तसेच गीतकारांना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आवाहन केले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-11-2013 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner appeals to poets to write a glory song for pcmc