सूरत महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश (ड्रेस कोड) बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती. मात्र, पाटील यांची बदली होताच, गणवेशाच्या सक्ती आदेशाला सर्वांनी मिळून केराची टोपली दाखवली आहे.पिंपरी पालिकेच्या एका शिष्टमंडळाने नुकताच गुजरात दौरा केला होता.तेव्हा सूरतला महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश असल्याचे पाहून सर्वजण प्रभावित झाले.
दहीहंडीमध्ये उंचावरुन पडल्यामुळे मेंदूमृत झालेल्या तरुणाचे अवयवदान; चार गरजू रुग्णांना जीवदान
दौऱ्यावरून परतल्यानंतर पिंपरी पालिकेत अशाप्रकारे गणवेश बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्त पाटील यांनी तसे आदेशही काढले. १५ ऑगस्टपासून प्रत्येकाला हा गणवेश बंधनकारक करण्यात आला. मात्र, त्या दिवशी सार्वजिनक सुट्टी होती. दुसऱ्या दिवशी,१६ ऑगस्टला दुपारीच राजेश पाटील यांची बदली झाली.
पाटील यांनी बदलीपूर्वी दिलेल्या आदेशानुसार कोणीही नव्या स्वरूपातील गणवेश परिधान केले नाहीत. आयुक्तांची बदली झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नंतर हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही. गणवेशाबाबत नव्या आयुक्तांची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.