पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत वायू प्रदुषणामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वायू प्रदुषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांची समिती स्थापन करावी आणि व्यवस्थापनाबाबतचा अहवाल तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
वैकुंठ स्मशानभूमीसंदर्भातील प्रश्नांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेतली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यावेळी उपस्थित होते. वैकुंठ स्मशानभूमीतील धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी काही सूचना महापालिकेला केली. वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे वापर होत असलेले लाकडावरील शवदहन कमी करावे आणि लाकडावरील दहन ऐवजी विद्युत आणि गॅस दहिनीची उभारणी करावी. त्याचबरोबर धुराड्याच्या चिमणीची उंची वाढवणे, हवेत जाणाऱ्या धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी ड्राय स्क्रबरची उभारणी करणे आदी उपाययोजना तातडीने करण्यासही पाटील यांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा असे एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी विकेंद्रित स्वरुपात या सुविधांचा वापर केल्यास वैकुंठ प्रमाणे एकाच ठिकाणी जास्त ताण येणार नाही, असेही अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी सांगितले. तसेच ‘निरी’ आणि महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियमाक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांची कार्यवाही सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.