पिंपरी- चिंचवड मध्ये जेवण बनवण्याच्या वादावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी मुकेश हिरा कुसवाह ला अटक केली आहे. दिपू कुमार असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश हिरा कुसवाह आणि हत्या झालेला दिपू कुमार यांच्यासोबत इतर तीन तरुण चिंचवड मधील व्ही.के.व्ही कंपनीत काम करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दोन महिन्यापूर्वीच दिपू कुमार हा चिंचवडमधील कंपनीत काम करण्यास आला होता. कंपनीत एकूण पाच जण काम करायचे आणि तिथेच राहायचे. जेवण ही तिथेच बनवून खात असायचे. परंतु, शुक्रवारी जेवण बनवण्यावरून मुकेश आणि दिपू यांच्यात वाद झाले. काही वेळानंतर सर्वजण जेवण करून झोपले. दिपू इतर दोन तरुणांसह झोपला. शनिवारी रात्री एकच्या सुमारास मुकेश कुसवाह झोपत नव्हता. तो सतत विचारात होता. त्याला दिपू कुमारचा राग आला होता. याच रागातून झोपेत असलेल्या दिपू कुमारच्या डोक्यात अवघ्या वीस सेकंदात 11 लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. ही सर्व घटना कंपनीत लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पिंपरी पोलिसांनी मुकेश हिरा कुसवाह ला अटक केली आहे.