पुणे : कोथरुडमधील तेजसनगर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दीड लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला तेजसनगरमधील इंद्रधनू सोसायटीत राहायला आहे. तक्रारदार महिलेची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख ५३ हजारांचे दागिने लांबविले. सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compensation in house burglary kothrud thieves pune print news ysh