पुण्याच्या महाविद्यालयीन विश्वात आपले स्थान निर्माण केलेल्या ‘फिरोदिया करंडक’ आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेची पूर्व प्राथमिक फेरी ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदत आहे.
सामाजिक-आर्थिक विकास संस्था आणि स्वप्नभूमीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या फिरोदिया करंडक फेरीची सुरुवात ३१ जानेवारीपासून होणार आहे. या स्पर्धेचे हे चाळीसावे वर्ष आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ४६ महाविद्यालये सहभागी झाली आहेत. महाविद्यालयांना प्रवेश अंतिम करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक फेरी, प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेची पूर्वप्राथमिक फेरी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान आणि अंतिम फेरी १ मार्चला होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा