नारायणगाव : खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन तक्रारदारांमध्ये वाद होऊन एका तक्रारदाराने दुसऱ्या तक्रारदाराच्या गळ्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. क्षितिज बाबाजी दांडगे (रा. दोंदे, ता. खेड ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : मित्रांशी शरीरसंबंध ठेवावे म्हणून मैत्रिणीला केली मारहाण; महिलेसह तिघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोंदे (ता. खेड) येथे दोन कुटुंबामध्ये वाद होऊन सोमवारी मारामारी झाली होती. पत्नीला मारहाण झाल्यामुळे वैभव गोविंद बोऱ्हाडे तक्रार देण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात आले होते. याचवेळी क्षितिज बाबाजी दांडगे हादेखील तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी दोघा तक्रारदारांना एकत्र बसवून ठेवले होते. या दोघांमध्ये पुन्हा पोलीस ठाण्यात बाचाबाची झाली. पत्नीला मारहाण केल्याचा राग अनावर होऊन वैभव बोऱ्हाडे याने खिशातील ब्लेड काढून दांडगे यांच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात दांडगे गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तत्काळ जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.