पुणे : मतदानाला जात असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला शिवीगाळ करुन मारहाण केली. भाजपला मतदान करा, नाहीतर तुम्हाला बघून घेताे, अशी धमकी दिल्याचा आरोप भवानी पेठेतील कासेवाडी भागातील मतदारांनी केला आहे. याबाबत कासेवाडीतील रहिवासी सुरेखा राजू खंडाळे यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. कांबळे आणि समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेखा खंडाळे, मीरा हेमंत बिघे, पारु दहातोंडे, जायदा शेख या बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी पावणेएकच्या सुमारास गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्ट येथील मतदान केंद्रात मतदानाला निघाल्या होत्या. त्यावेळी भाजप उमेदवार सुनील कांबळे, तुषार तानाजी पाटील, तनवीर तानजी पाटील, अरविंद जाधव, आकाश अविनाश पाटोळे, सनी अडागळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली. अश्लील वर्तन केले. आमच्याविरुद्ध तक्रार केल्यास त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. मी स्थानिक आमदार आहे, राज्यात आमचाच गृहमंत्री आहे, अशी धमकी सुनील कांबळे यांनी दिली, असा आरोप खंडाळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे.

हेही वाचा – बारामतीत राडा… मतदान चिठ्ठ्यांवर घड्याळाचे चिन्ह?

हेही वाचा – खराब हवेमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला! संशोधनातील निष्कर्ष; काळजी घेण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला

भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा आरोप

दयानंद अडागळे, ज्योती अडागळे, आरती रमेश अडागळे, हितेशा दत्तात्रय अडागळे या बुधवारी गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्टच्या मतदान केंद्रात थांबल्या होत्या. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते तनवीर तानाजी पाटील, तुषार पाटील हे पाच ते सहा साथीदारांसह तेथे आले. त्यांनी दयानंद अडागळे यांना धक्काबुक्की केली, तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. भाजपला मतदान करा. नाहीतर तुम्हाला बघून घेतो. अशी धमकी दिली. भाजप कार्यकर्त्यांनी मतदान करताना रोखले, असा तक्रार अर्ज दयानंद राजू अडागळे यांनी खडक पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint application to police against bjp candidate sunil kamble pune print news rbk 25 ssb