पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी दिलीप आणि त्यांची पत्नी मनोरमा यांना नुकतीच अटक करण्यात आली होती.

हेही वाचा >>> Police Recruitment 2024: ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत उद्या शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?

तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार अर्ज दिला. पोलिसांकडून तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तक्रार अर्जामुळे दिलीप खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिक्षण काळात खेडकर यांनी स्वतंत्र दालनाची मागणी केली, तसेच मोटारीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये किती टक्के पाणीगळती? पाण्याचे ऑडीट झाले का? वाचा…

खेडकर यांच्या बडेजावाची तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर दिवसे यांनी याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला. पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे, यासाठी दिलीप यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले जात नाही, तसेच त्यांना कर्मचारी, कार्यालयीन कामकाजात शिपाई उपलब्ध करून दिले जात नाही. मुलगी पूजा खेडकर यांना सुविधा द्याव्यात, यासाठी दिलीप यांनी दबाब टाकला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यांनी दिलेल्या दोन पानी तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आकडे यांना जबाब नोंदविण्यासाठी बुधवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. मात्र, ते कामात व्यस्त असल्याने जबाब नोंदविण्यासाठी आले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.