पुणे : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नुकतीच (७ फेब्रुवारी) नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मात्र, दिवसे यांच्या नियुक्तीवर आम आदमी पक्षाने हरकत घेतली असून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

गेल्या चार वर्षांपासून दिवसे हे पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे दिवसे यांची बदली रद्द करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दिवसे यांच्या बदली बरोबर इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीवर देखील आक्षेप घेण्यात आला आहे. या विरोधात देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Eknath Shinde announcement in the meeting of government officers employees organizations regarding pension
निवृत्तिवेतनासाठी सर्व पर्याय खुले; शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Pratap Chikhalikar, Nanded by-election,
नांदेड पोटनिवडणूक लढण्यास प्रताप चिखलीकर पुन्हा इच्छुक
Power contract workers union hunger strike postponed
ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत

हेही वाचा…पुणे : नवले पूल परिसरात पुन्हा अपघात ; टँकरची सात ते आठ वाहनांना धडक

दिवसे हे जुलै २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त होते. त्यानंतर सप्टेंबर २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुण्यात राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ७ फेब्रुवारीला पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून दिवसे यांची नियुक्ती झाली. तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी, असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. दिवसे यांच्या बदलीने या नियमाचा भंग झाला आहे. किंवा निवडणूक आयोगाचा नियम डावलून दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच दिवसे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी पदावर झाल्याने तेच जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

दरम्यान, २१ डिसेंबर २०२३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलण्याचे निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळ जिल्ह्यात झाला असेल, मात्र संबंधित अधिकारी निवडणुकीची संबंधित काम करणार नसेल, तर तो जिल्ह्यात राहू शकतो.

हेही वाचा…दुर्मिळ फर्मान पाहून राज ठाकरेंची अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी; उपस्थितांमध्ये पिकला हशा, म्हणाले, “स्वल्पविराम..”

मात्र भविष्यात अशा अधिकाऱ्याकडे निवडणुकीशी संबंधित काम देण्यात येऊ नये, अशी अट आयोगाने घातलेली आहे. याच अटीचे उल्लंघन दिवसे यांची बदली करताना झाले आहे. दिवसे जवळपास चार वर्षे पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत आणि आता त्यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असणार आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे कुंभार यांनी सांगितले.