मावळ : मतदानाच्या दिवशी उमेदवारांना मोटारीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास मनाई असताना देखील मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मोटारीवर त्यांचे ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचा दावा करत तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा-मावळमध्ये पहिल्या दोन तासात किती झाले मतदान?

महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मोटारीवर मशाल या निवडणूक चिन्हाचे स्टिकर लावून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड- उघड भंग आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint of violation of code of conduct against mahavikas aghadi candidate sanjog waghere pune print news ggy 03 mrj