वीज ग्राहकांच्या जलद तक्रार निवारणासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलातील सर्व विभागात महिन्याच्या पहिल्या मंगळवारी वीज ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जून महिन्यापासून दरमहा पहिल्या मंगळवारी रास्ता पेठ, पद्मावती, नगर रोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभागांत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता सकाळी ११ ते १ दरम्यान वीज ग्राहकांच्या तक्रारी दाखल करून घेतील आणि तक्रार निवारणासाठी कार्यवाही करतील. एखाद्या महिन्याच्या पहिल्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येईल, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.—-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा