पुणे-नगर रस्त्यावर विमाननगर येथे गुरुवारी रात्री ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीस्वार संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला.
गणेशकुमार चोरखा सिंग (वय ३०, सध्या रा. खराडी. मूळ रा. चेन्नई), असे या घटनेत मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रामू गुगे या ट्रक चालकास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशकुमार हा पुणे-नगर रस्त्याने दुचाकीवरून घरी निघाला होता. विमाननगर भागामध्ये एक ट्रक सव्र्हिस रस्त्याने मुख्य रस्त्यावर येत असताना गणेशकुमार याने हा ट्रक ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यात ट्रकची धडक दुचाकीला बसली. त्यामुळे गणेशकुमार खाली पडला व थेट ट्रकच्या चाकाखाली सापडला. त्यात तो जागीच ठार झाला.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा