पिंपरी : व्यायाम करताना ह्दयविकाराचा झटका आल्याने कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी याच्या मृत्यूची घटना समोर आली असतानाच हिंजवडीतीलच एका जिममध्ये व्यायाम करून घरी परतलेल्या संगणक अभियंत्याचा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 संजीव कुमार (वय ४४, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. कुमार हे मंगळवारी जिममध्ये गेले. तेथे त्यांनी व्यायाम केला. मात्र, घरी आल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. कुमार हे हिंजवडी आयटी पार्क मधील एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करीत होते. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.