पुणे : समाजमाध्यमात अश्लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी कात्रज भागातील एका तरुणाकडून दहा लाख ४२ हजार रुपयांची खंडणी (सेक्सटाॅर्शन) उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कात्रज भागातील आंबेगाव येथे राहायला आहे. तो एका सराफी पेढीत संगणक अभियंता (आयटी ऑफिसर) आहे. त्याच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलेने संपर्क साधला (व्हिडीओ काॅल) होता. महिलेने तरुणाला जाळ्यात ओढून नकळत ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत बुवाबाजीच्या नावाने पादचाऱ्याची ९० हजाराची फसवणूक

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला. दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील आयुक्त श्रीवास्तव बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. सायबर गुन्ह्याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे सांगून चोरट्यांनी तरुणाला धमकावले. त्याच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने दहा लाख ४२ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तपास करत आहेत.

Story img Loader