प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. पुण्यातील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते. तसंच मागोवा आणि तात्पर्य या मासिकांचे संपादकही होते.
डेक्कन जिमखाना परिसरातील त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव आज दुपारी ४ नंतर ठेवण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार केले जातील. मागोवा आणि तात्पर्य या मासिकांच्या माध्यमातून तसंच मागोवा या गटाद्वारे सत्तरीच्या दशकातल्या तरुण पिढीला मार्क्सवादी विचारांकडे वळवण्याचं कार्य केलं.