पुणे : Maharashtra Weather Forecast मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भाला ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांत, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात वायव्य दिशेला ओदिशाच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे २१ ऑगस्टपर्यंत विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. या काळात विदर्भात चांगला पाऊस अपेक्षित आहे. नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.