शिवसेनेच्या पुणे जिल्ह्य़ाच्या संपर्कप्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे व शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले अंतर्गत मतभेद िपपरी पालिकेतील स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीवरून चव्हाटय़ावर आले आहेत. त्या सामथ्र्यवान नेत्या असून आपल्यापेक्षा त्यांना राजकारण जास्त कळते, असा टोला आढळराव यांनी लगावला.
जिल्हा शिवसेनेत अलीकडे डॉ. गोऱ्हे यांच्याविरूध्द असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार आढळरावांचे तर त्यांच्याशी बिलकूल जमत नाही. शिरूर मतदारसंघातील अनेक विषयांमध्ये आढळराव व गोऱ्हे यांची परस्परविरोधी भूमिका यापूर्वी अनेकदा दिसून आली आहे. िपपरीत शिवसेनेकडे स्थायी समितीच्या दोन जागा होत्या. त्यावर आढळराव व खासदार गजानन बाबर यांच्यासह स्थानिक नेत्यांना विचारात न घेता नियुक्तया झाल्या. त्यावरून पक्षात तीव्र नाराजी असतानाच आढळराव यांनी आपल्या भावना स्पष्टपणे बोलून दाखवल्या आहेत. पक्षाने शिफारस मागितली म्हणूनच भोसरी मतदारसंघातील चार सदस्यांची नावे सुचविली. मात्र, एकालाही संधी दिली नाही. जर ऐकायचे नव्हते, तर विचारले कशाला, असा मुद्दा आढळराव यांनी उपस्थित केला. पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचे काम पुणे जिल्ह्य़ातून सुरू आहे, असे सूचक विधान करत डॉ. गोऱ्हे व जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे यांच्याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला. जिल्ह्य़ातून लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १२ जागा शिवसेना लढवते. त्याजिंकण्यासाठी संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख सक्षम आहेत. राज्यभराच्या दौऱ्यांमध्ये ते सातत्याने असतात, जिल्ह्य़ात तर त्यांची फारच ताकद आहे, त्यांचे जनमानसात फार मोठे वलय आहे. तेच पक्षाला या जागाजिंकून देणार आहेत. यापुढील सर्व निर्णय त्यांनाच विचारून करावे, असा नाराजीचा सूर आढळराव यांनी व्यक्त केला.

Story img Loader