आगामी पुणे महापालिका निवडणूक तीन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार याबाबत संभ्रम आहे. महाविकास आघाडीला तीन सदस्यीय, तर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेसाठी चार सदस्यीय प्रभागरचना सोयीस्कर आहे. त्यामुळे पुण्यातील इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.दरम्यान, किती सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक हाेईल, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे बुधवारी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे विमानतळावरील बहुमजली वाहनतळ उद्यापासून कार्यान्वित; हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी सायंकाळी राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, संख्या यांचे प्रारुप तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सात दिवसांत तयार करू शकताे. त्यानंतर ताे जाहीर करणे आणि त्यानुसार मतदार याद्या फाेडल्यानंतर त्यावर हरकती आणि आक्षेप नोंदविणे. त्यावर सुनावणी घेणे, आरक्षणाची साेडत काढणे याकरिता प्रशासनाला किमान दाेन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागू शकताे. ही प्रक्रिया पूर्ण हाेण्यास फेब्रुवारी महिना उजाडू शकताे. यानंतर राज्य निवडणूक आयाेगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे निवडणूक ही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात हाेण्याची शक्यता आहे. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १७३ झाली हाेती. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत ही संख्या १६६ च्या आसपास असेल असा अंदाज व्यक्त हाेत आहे.

हेही वाचा >>>विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा; प्रकृती चिंताजनक – पत्नीचा खुलासा

भाैगोलिक समताेलाची गरज
महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश झाला आहे. या समाविष्ट गावांपैकी ११ गावांचा एक प्रभाग तयार केला गेला होता. या प्रभागातून दाेन सदस्य निवडून आले होते. मात्र, या प्रभागाची रचना भौगोलिकदृष्ट्या समतोल नव्हती. शहराच्या दक्षिण – पश्चिम भाग आणि दक्षिण-पूर्व भागाचा या प्रभागात समावेश होता. नव्याने २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट केली गेली. तीन प्रभाग पद्धतीनुसार या संपूर्ण ३४ गावांमध्ये प्रभाग रचना केली गेली हाेती. या भागात मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांची संख्या अधिक निर्माण हाेणार हाेती. मात्र, आता नवीन रचनेतही हाच भाैगाेलिक समताेल साधावा लागणार आहे. यापूर्वी महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धती नुसार झाली हाेती. जुन्या प्रभागांना या गावांचा भाग जाेडून नवीन रचना केली जाण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion about whether the pune municipal election will be held in a three or four member ward system pune print news amy