लोणावळा: नाताळ सणाला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. लोणावळ्यात मोठ्या संख्येने मुंबईतील पर्यटक दाखल झाल्याने सकाळपासून द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाताळ सण सोमवारी (२५ डिसेंबर) आहे. शनिवार आणि रविवारला नाताळची सुट्टी जोडून आल्याने मोठ्या संख्येने मुंबई-पुण्यातील पर्यटकांनी सकाळपासून गर्दी केली होती. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनाका आणि खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूकीचा वेग कमालीचा संथ झाला होता. त्यामुळे घाटात इंजिन गरम होऊन मोटारी बंद पडत होत्या.

हेही वाचा… मनोज जरांगे यांच्या इशारा सभेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया… म्हणाले, ‘कोणी काय मागणी करावी…’

मोटारी बंद पडल्याने कोंडीत भर पडली. घाट क्षेत्रातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बोरघाट महामार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते. खंडाळा बोगदा परिसरात मुंबईकडे जाणारी वाहने काही काळ थांबवून ठेवण्यात आली होती. मुंबईहून लोणावळ्याकडे येणाऱ्या माेटारींसाठी सर्व सहा मार्गिका खुल्या करुन देण्यात आल्या होत्या. मात्र, मोठ्या संख्येने मोटारी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिसांची धावपळ उडाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congestion on expressway due to holidays crowd of tourists in lonavala on the occasion of christmas pune print news rbk 25 dvr