महापालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेली नालेसफाई, सांडपाणी वाहिन्यांची कामांबाबतची श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे गुरुवारी केली.

हेही वाचा >>>पुणे: ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

शहरात चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहर आणि उपनगराचा भाग पाण्यात गेला. मध्यवस्ती भागातील सोसायट्या आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, प्रशासकांची भेट घेतली. राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, माजी मंत्री उल्हास पवार, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, कमल व्यवहारे, संगीता तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : खिल्लार गायींचे कळपाने संगोपन करणारे सलगरे ; एका शेतकऱ्याकडे असतो पन्नास गायींचा कळप

पाच वर्षांत भाजपने प्रशासनावर दबाव टाकून केवळ ठेकेदारांच्या हिताचे निर्णय घेतले. काम न करताना ठेकेदारांना देयके देण्यात आली. पाच वर्षांत नालेसफाई, सांडपाणी वहन व्यवस्था आणि सांडपाणी नियोजनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले तर भाजपने केवळ टक्केवारीकडे लक्ष दिले. त्यामुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे. त्यामुळे या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करण्यात आल्याचे अरविंद शिंदे यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन कामे तातडीने करणे आवश्यक होते. मात्र लहान व्यासाच्या पावसाळी वाहिन्यांचे आणि अतिवृष्टीचे कारण आयुक्त पुढे करत आहेत. कसबा क्षेत्रीय कार्यालयाकडून चारशे कोटींची विकासकामे करण्यात आल्याचे केवळ दाखविले जात आहे, असे गोपाळ तिवारी यांनी सांगितले.

Story img Loader