पुणे : ‘खोटी आश्वासने देऊन मतविभागणी करण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसकडून गरिबांचा वापर केवळ मतांसाठी करण्यात येत असून, नंतर त्यांचे शोषण करण्यात येत आहे, असा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी सोमवारी केला. काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याने सतर्क राहून नागरिकांनी महायुतीला साथ द्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय जनता पाक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र केंद्रात सैनी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हरियाणामध्ये भाजपला मिळालेल्या बहुमतामध्ये गरिबांचा मोठा वाटा आहे.
हेही वाचा – पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
हेही वाचा – हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
े
“तिसऱ्यांदा भाजप सरकारला बहुमत दिले, यात गरिबांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा निवडणुकीमध्ये महिलांना आणि तरुणांना आश्वासने दिली. मात्र, त्याची पूर्तता केली नाही. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने राज्यघटनेबाबत खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल केली. काँग्रेसच्या काळात केवळ घोषणा झाल्या, मात्र विकास खुंटला. देशातील गरीब आणखी गरीब झाले. पंतप्रधान मोदींच्या दहा वर्षांच्या काळात गरीब मुख्य प्रवाहात आले. त्यांना सन्मान मिळाला. मोदी यांनी २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले. दहा वर्षांत चार कोटी नागरिकांना घरे दिली. पायाभूत सुविधा, रेल्वे सेवा मजबुतीकरण, विमानतळ विस्तारीकरण, आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण, सीमावर्ती भागात सुरक्षित वातावरण मोदी सरकारने केले. काँग्रेस काळात दहशतवादामुळे लोक भयभीत होते आणि तीच परिस्थिती त्यांना पुन्हा निर्माण करण्याची इच्छा दिसून येत आहे,” अशी टीका सैनी यांनी केली.