पुणे: पाच दशकांचे काँग्रेस निष्ठेचे योगदान, नगरसेवक, महापौर, आमदार, राज्यमंत्री आणि शहराध्यक्ष अशा पदांवर केलेले काम आणि शहरातल्या सर्व घटकांशी असलेला घनिष्ठ संबंधांच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत मीच खरा दावेदार आहे, असा दावा माजी मंत्री चंद्रकांत उर्फ बाळासाहेब शिवरकर यांनी केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी अधिकृत दावेदारीही केली आहे, असेही शिवरकर यांनी म्हटले आहे.
पाच दशके पुण्यातील काँग्रेससाठी निष्ठेने कार्यरत आहे. नगरसेवक पदापासून राज्यमंत्रिपदापर्यंतच्या अनेक पदांवर काम केले आहे. शहर काँग्रेसच्या वाढीसाठी योगदान दिले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात सहा वर्षे शहराध्यक्षपद सांभाळून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवरकर यांनी केली आहे.
हेही वाचा… एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका; ११ लाखांची वसुली
शहरातील सर्व ज्येष्ठ आणि तरूण युवकांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ घेऊन प्रदेशाध्यक्षांबरोबर यासंदर्भात चर्चा करणार, असे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.