काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी सेवा कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे आयोजन केले होते.त्या कार्यक्रमाच्या समारोपास काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी गटनेते आबा बागूल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमा वादावरून सतत विधान करीत आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत विधान करून दोन्ही राज्यात तेढ निर्माण होईल अशा प्रकारची विधान करीत आहे.यामुळे दोन्ही राज्यात वातावरण खराब करण्याच काम ते करीत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांची बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे.अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्यापपर्यंत आली नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीला जाण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आपल्या राज्याची भूमिका मांडावी,असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा