देशातील ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक भ्रष्टाचाराबरोबर नैतिक व राजनैतिक भ्रष्टाचार मोदी सरकारकडून सुरू आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार शेतक-यांचा सूड घेत आहे. देशभरात नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी- चिंचवड सांगवी येथील महाविकास आघाडीच्या सभेत मोदी सरकार व भाजपवर सडकून टीका केली.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – शेतकरी कामगार पक्ष – स्वराज इंडिया – मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकारमुळे बेरोजगारीचे भूत देशाच्या मानगुटीवर बसले. नोटबंदी, जीएसटी, शेतकरी काळे कायद्यांमुळे त्यांना अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही. डिझेल, पेट्रोलच्या किंमती वाढवून देश महागाईच्या घाईत लोटला. मनमोहन सिंह यांच्या काळातील आर्थिक विकासाचा दर राहिलेला नाही. आमदारांची खरेदी-विक्री करून सरकारे पाडली जात आहेत. त्यांच्या मान्यतेने राज्य सरकारे पाडली जातात. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणणा-या मोदींचे सर्वात भ्रष्ट सरकार ते चालवत आहेत. भाजपच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांचा मोदी सूड घेत आहेत.
साखरेवर, कांद्यावर निष्ठूरपणे निर्यातबंदी करून कोट्यवधी शेतक-यांचे नुकसान केले. निर्यात बंदी उठवून पुन्हा भरमसाठ कर लावला. शेतक-याला दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाड तयार झालेली आहे. काँग्रेस पक्षाचे उत्कृष्ट जाहीरनामा दिलेला आहे. सर्व घटकांना न्याय देण्याचे काम इंडिया आघाडीचे सरकार करणार आहे. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी आमदार फरपटत गेले. पण मतदार त्यांना धडा शिकविणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेला फितुरी, गद्दारी, विश्वासघात चालत नाही. संजोग वाघेरेंच्या निमित्ताने चांगला खासदार निवडून द्या आणि उध्दव ठाकरेंचे हात बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले.
मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी: खा. संजय सिंग
खासदार संजय सिंग म्हणाले, इथे असलेली गर्दी दाखवते की संजोग वाघेरे विजयी होत आहेत. उध्दव ठाकरे यांनी अरविंद केंजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्लीत येऊन साथ दिली. ठाकरेंनी पाठ दाखवून कोणाला धोका दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून हाच संदेश देतो की, ज्यांनी उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यासोबत गद्दारी केली, त्यांना माफ करू नका. बाईकचोर, दागिने चोरानंतर देशात पक्ष चोरणारे आलेले आहेत. मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी आहे. बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, १५ लाख देणे, पक्के घर देण्यावरून खोटी गॅरँटी दिली. देशातील जतना त्यांना हरविण्यासाठी तयार आहे. ते जिंकले, तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील. त्यांचे हगे राजकारण संपविण्यासाठी गेल,
“रामकृष्ण हरी, आमची मशाल भारी”: खा. सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हवा आपल्याच बाजुने आहे. तीन आपला लकी नंबर असून महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी मतदान करा. वाटप होणार, तर होणार आहे. गलिच्छ राजकारण सुरू आहे. राज्यात लाडके मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्याकडून आमच्या सर्वांच्या प्रचंड अपेक्षा आहे. इंडिया आघाडी एक कुटुंबाप्रमाणे काम करत आहे. संजोगभाऊ तुम्हाला माझ्याबरोबर दिल्लीला चलायचं आहे. देशातील सर्वात भ्रष्ट महापालिका म्हणून पिंपरी चिंचवडला म्हटले जाते. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी मतदान करा. मावळमध्ये “रामकृष्ण हरी, आमची मशाल भारी” हा नारा आपल्याला बुलंद करायचा आहे, असे आवाहन त्यांनी केली.