पुणे : मागील काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुक लढविणार अशी चर्चा सुरू होती. ती चर्चा थांबत नाही तोवर काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी या देखील पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाली. या सर्व घडामोडी दरम्यान आज पुणे दौर्यावर काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी आल्या आहेत.
हेही वाचा : महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी जलमापक नाही! पुणेकरांना मात्र नोटीस
पुण्यातील त्यांच्या कार्यक्रमाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. तर यावेळी पुणे विमानतळावर आगमन झाल्यावर प्रियांका गांधी यांना व्हीआयपी ताफा होता. मात्र त्यांनी वॅग्नोर (Wagnor) या चारचाकी वाहनांतून जाण्यास पसंत केले. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे एका खासगी कार्यक्रमासाठी प्रियांका गांधी या आल्या आहेत. त्या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.