महासत्तेच्या स्पर्धेत जाणे अवास्तव आहे. कार्यक्षमतेने विकसित होणे अधिक महत्त्वाचे आहे. चीनमधून आयात ११९ टक्के वाढली आहे. भाजपकडून सुरू असलेला कर दहशतवाद धक्कादायक आहे. श्रीमंत व्यक्ती देश सोडून जात असल्याची टीकाही त्यांन केली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसतर्फे आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात डॉ. थरूर बोलत होते.
हेही वाचा >>> रोजगार न मिळालेले मंदिराने कसे संतुष्ट होतील? काँग्रेसचे खासदार डॉ. शशी थरूर यांचा सवाल
काँग्रेसचे सरचिटणीस आशिष दुआ, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, प्रवक्ते गोपाळ तिवारी, ‘एनएसयूआय’चे अक्षय जैन या वेळी उपस्थित होते. संग्राम खोपडे यांनी डॉ. थरूर यांच्याशी संवाद साधला. गेल्या दहा वर्षांत जागतिक पातळीवर भारताचा डंका वाजत असल्याचा मोदी सरकारचा दावा धादांत खोटा आहे. शेजारील देशांशी संबंध बिघडले आहेत. भूक निर्देशांक, माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक अशा निर्देशांमध्ये भारताचे स्थान घसरले आहे, असे डॉ. थरूर यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी सरकारने केली नाही. तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सध्याच्या सरकारने पाठीशी घातले. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री महिला असताना नोकरदार महिलांसाठी फार काही सकारात्मक घडले नाही, असेही थरूर म्हणाले.