लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रासाठीची महत्त्वपूर्ण बैठक आज (मंगळवार, २२ जानेवारी) होणार आहे. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला घेणार आहेत. यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार असून शक्तिप्रदर्शनही होणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीला दीड हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

आणखी वाचा-रेल्वेचा मोठा निर्णय : लोणावळा लोकल आता दुपारीही धावणार; जाणून घ्या वेळा…

बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. शहर, जिल्हा आणि ग्रामीण स्तराचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच बूथ समित्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी, संघटनात्मक बांधणी अशा विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress meeting in pune today to prepare for the lok sabha elections pune print news apk 13 mrj